शरद पवारांच्या सल्ल्याचा भाजपने घेतला समाचार

sharad-pawar
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चाकण येथील सभेमध्ये बोलताना पुलवाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या बदला घेण्यासाठी भारताने केलेल्या एअरस्ट्राईकची कारवाई आमच्या सल्ल्यानेच झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्यांनी लगेचच आपल्या दाव्यावर स्पष्टीकरण दिले. प्रसारमाध्यमांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे पवार यांनी म्हटले. पण आता त्यांच्या सल्ल्याचा भाजपने ट्विटरच्या माध्यमातून समाचार घेतला आहे.


ट्विटवरुन व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजपने शरद पवारांच्या त्या सल्ल्यावरुन त्यांना टोला लगावला आहे. साहेबांच्या माघार पर्वाच्या यशस्वी प्रयोगानंतर सादर होत आहे नवीन प्रयोग सल्ला पर्व, या कॅप्शनसहीत व्यंगचित्र ट्विट केले आहे. भाजपने #साहेबांचा_सल्ला #भ्रष्टवादी_काँग्रेस हे दोन हॅशटॅगही या ट्विटमध्ये वापरले आहेत. व्यंगचित्रामध्ये शरद पवारांच्या तोंडी ‘नेटफिक्स’वरील ‘सिक्रेड गेम्स’ सिरीजमधील नवाजुद्दीनचा लोकप्रिय कभी कभी लगता है मैं ही भगवान हूं! हा संवाद दाखवण्यात आला आहे. तर खुर्चीवर चेहरा पाडून बसलेल्या पवारांच्या या फोटोमागे पवारांनी इम्रान खान आणि डोनाल्ड ट्रम्प यांनाही सल्ला दिल्याचे रेखाटण्यात आले आहे. अभिनंदनला सोडा असा सल्ला मीच इम्रान खान याला दिला होता. आणि किम जोंग उनला भेटून घ्या असा सल्ला मी डोनाल्ड तात्या ट्रम्प यांना दिला होता, असा दावा पवार करत असल्याचे या व्यंगचित्रात म्हटले आहे.