या मुलीचे वयाच्या 16व्या वर्षी का बरे झाले असेल नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन

greta
नुकतीच नोबेल शांतता पुरस्कारांच्या नामांकनाची घोषणा करण्यात आली आहे. यात आश्चर्यकारक रित्या एका 16 वर्षीय स्वीडिश मुलीला देखील नामांकन मिळाले आहे. या मुलीचे नाव ग्रेटा थुनबर्ग असे असून शांततेच्या नोबेल पुरस्काराचे नामांकन तिला मिळाले आहे. तत्पूर्वी २०१४ मधील नोबेल शांतता पुरस्कार एक पाकिस्तानी विद्यार्थिनी मलाला युसूफझाई हिला शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केल्यामुळे मिळाला होता.
greta1
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ग्लोबल वार्मिंग रोखण्यासाठी गेल्यावर्षी ‘स्कूल स्ट्राइक’ करून स्वीडिश संसदेसमोर धरणे आंदोलन ग्रेटाने केले होते. इतर विद्यार्थीनी आणि विद्यार्थ्यांचीही मदत या कामात ग्रेटाला मिळाली होती. या अभियानाचे या सर्वांनी मिळून जोरदारपणे समर्थन केले होते.
greta2
त्याचबरोबर १६ वर्षीय या मुलीने अभियान यशस्वी करण्यासाठी शाळेत जाणेही बंद केले होते. शेवटी ग्रेटाची मेहनत फळाला आली. हे अभियान त्यानंतर केवळ यूरोपच नाही तर जगभरात चर्चेचा विषय बनले आहे. तसेच ग्रेटाने डिसेंबर २०१८ मध्ये पोलंडमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या क्लायमॅट चेंज कॉन्फरन्समध्ये ग्लोबल वार्मिंगबाबत जबरदस्त भाषण दिले होते. त्यानंतर ती जगासमोर एक स्टार म्हणून समोर आली. ग्रेटाचे वय पाहता भलेही तिला जगाची पूर्ण समज नसावी, पण ग्लोबल वार्मिंगबाबतचे तिचे विचार इतरांपेक्षा फार वेगळे आणि मोठे आहेत.
greta3
ग्रेटा नोबेलसाठी मिळालेल्या नामांकनाबाबत म्हणते की, जमिनीखालील तेल आणि खनिजांना सुरक्षित ठेवण्याची आपण सर्वांनीच जबाबदारी आहे. तसेच जगात आपल्याला समानता आणण्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. जर सिस्टमच्या आत राहून आपण समाधान शोधू शकत नाही तर आपण पूर्ण सिस्टीम बदलायला हवी. फार कमी वयात ग्रेटाने आपल्या भाषणातून जगातील मोठमोठ्या लोकांना हैराण केले होते. त्याचबरोबर ग्लोबल वार्मिंगबाबत ग्रेटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देखील कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.
मलाला युसुफझाईला नोबल पुरस्कारासाठी नामांकन

Leave a Comment