मलाला युसुफझाईला नोबल पुरस्कारासाठी नामांकन

ऑस्लो दि. २ – महिलांना शिक्षण मिळावे यासाठी लढा देणाऱ्या आणि त्यासाठी तालिबानी अतिरेक्यांकडून डोक्यात गोळी घालण्याची शिक्षा मिळालेल्या पाकिस्तानच्या १५ वर्षीय मलाला युसुफझाई हिला यंदाचा शांततेसाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार मिळावा यासाठी तिचे नामांकन करण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. नामांकने पाठविण्याची अंतिम तारीख १ फेब्रुवारी रोजी संपत होती. १ फेब्रुवारीलाच तिचे नामांकन पाठविण्यात आले आहे.यावर्षीचे नोबेल पुरस्कार आक्टोबर १३ मध्ये जाहीर होणार असले तरी तालिबानी अतिरेक्यांच्या विरोधात आवाज उठविलेल्या मलाला हिला हा पुरस्कार दिला जावा अशी चर्चा दीर्घकाळ सुरू होती. तालिबान्यांच्या विरोधात आवाज उठविल्यामुळे मलाला हिच्या डोक्यात गोळ्या घालून तालीबानी अतिरेक्यांनी तिच्यावर सूड उगवला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मलालावर इग्लंडमध्ये उपचार सुरू असून तिचा डोक्याचे आणखी एक ऑपरेशन केले जाणार आहे.

Leave a Comment