काय सांगत आहे राजस्थानचा प्रसिद्ध फालोडी सट्टा बाजार?

satta
राजस्थानातील प्रसिद्ध सट्टा बाजार म्हणून फालोडीचा सट्टा बाजार देशात प्रसिद्ध आहे. निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच येथे सट्टा खेळण्याची सुरवात झाली असून सुरवातीचे अंदाज आत्ता काहीसे बदलले आहेत. सध्याच्या अंदाजानुसार केंद्रात पुन्हा एनडीएचे सरकार येईल आणि भाजपला २५० किंवा अधिक आणि एनडीएला ३०० किंवा अधिक जागा मिळतील असे वारे येथे सध्या वाहत आहेत. काही दिवसापूर्वी कॉंग्रेसला १०० किंवा अधिक जागा मिळतील असे सट्टेबाज सांगत होते मात्र आता कॉंग्रेस ला ७० ते ७२ पर्यंत जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सट्टेबाज सांगतात, पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या हवाई दलाने केलेल्या स्ट्राईकमुळे भाजपवरील मतदारांचा विश्वास वाढल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान मोदी पहिल्यापेक्षा जास्त मजबूत बनून सामोरे आले आहेत त्यामुळे सुरवातीला भाजपला २०० जागा मिळतील असे वाटत होते त्याऐवजी आता किमान २५० जागा मिळतील असे संकेत मिळत आहेत. राजस्थानात २५ पैकी १८ ते २० जागा भाजपच्या पारड्यात पडतील असा अंदाज सटोडिये व्यक्त करत आहेत.

Leave a Comment