‘या’ मायक्रो डॉट स्प्रेमुळे कार चोरी अशक्य

theft
कार चोरी हा जगभरात सर्वत्र सर्रास आढळणारा चोरीचा प्रकार आहे. दिवसेंदिवस कार चोरी गुन्हे वाढत चालले आहेत आणि अनेक राज्यांनी सिक्युरिटी नंबर प्लेट जारी करूनही कार चोरी रोखण्यासाठी त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. मात्र आता केवळ १ हजार रुपये खर्च करून कार चोरीची शक्यता संपुष्टात आणणे शक्य होणार आहे. यासाठी मायक्रो डॉट तंत्रज्ञानाच वापर केला जाणार असून असा वापर करण्यास केंद्र सरकारने त्याला हिरवा कंदील दाखविला असल्याचे समजते.
micro-dot
या संदर्भात ऑटोमोबाईल टेक्निकल स्टँडर्डची निरीक्षक संस्था सीएमव्हीआर आणि टीएससी यांच्यात नुकतीच एक बैठक झाल्याचे समजते. केंद्राची मंजुरी मिळाल्यावर त्यासंदर्भात अध्यादेश लागू केला जाईल आणि त्यानंतर देशात हे तंत्रज्ञान वापरत येईल असे सांगितले जात आहे..

या नव्या तंत्रानुसार युनिक नंबर आणि व्हेइकल आयडेंटीफीकेशन नंबर असलेले लेझर बेस्ड मायक्रो डॉटस कार, बस, ट्रकवर स्प्रे केले जाणार आहेत. हे नॅनो मायक्रोडॉट ०.५ मिमी साईजचे असतील आणि १० हजार मायक्रोडॉट वाहनावर फवारावे लागतील. यामुळे कारच नव्हे तर कारचे सुटे भाग काढून विकायचा प्रयत्न केल्यास ते आता समजणार आहे.हा पेंट कोणत्याची प्रकारे काढून टाकता येत नाही आणि अल्ट्रा व्हॉयलेट लाईट मध्ये तो पाहता येतो असे समजते. असा पेंट करून घेण्यासाठी वाहन मालकाला फक्त १ हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.

Leave a Comment