आकाश अंबानीच्या लग्नात शाहरुखची बेईज्जती, व्हिडीओ व्हायरल

neeta-ambani
मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश अंबानी यांचे 9 मार्चला श्लोक मेहताशी लग्न झाले होते. या शाही लग्नातील बरेच व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. वरातीपासून, जयमाला सप्तपदी आणि रिसेप्शन्सपर्यंतचे फोटोंना सर्वांनीच पसंती दिली. आकाशच्या वरातीत शाहरुख खान, रणबीर कपूर, करण जौहर आणि मिका सिंग यांच्यासारखे सेलिब्रेटी सामील झाले होते.

सर्व सेलिब्रेटींनी जोरदार डान्स केला. वरातीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खुप व्हायरल झाला. या व्हिडीओवरुन नेटकऱ्यांनी शाहरुख खानला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर आणि शाहरुख खान नाचत आहेत. त्यावेळी तिथे आकाश अंबानी येतो.


रणबीर तिथून निघून जातो पण शाहरुखला आकाश सांगतो की तुम्ही येथेच थांबा. त्यानंतर आकाश आपल्या आईला निता अंबानी बोलवतो. आकाश त्याच्या आई नीतासोबत डान्स करतो आणि शाहरुख त्यांच्यामागे उभा राहून त्यांचा डान्स बघत आहे. यावर नेटकरी म्हणतात की, आकाशने शाहरुखची बेइज्जती केली.

Leave a Comment