ऑस्ट्रेलियामध्ये झाला होता पहिला सामना 1877 साली क्रिकेटचा सामना

cricket
आज जगामध्ये सर्वात लोकप्रिय असलेला क्रिकेट हा खेळ अस्तित्वात येऊन आता १४२ वर्षे होत आहेत. भारतामध्ये तर क्रिकेट हा केवळ मैदानांतच नाही, तर रिकाम्या गल्ल्यांमध्ये, रस्त्यांवर, इतकेच नाही तर अगदी बिल्डींगच्या कंपाउंडमध्ये ही आवडीने खेळला जाणारा खेळ आहे. या खेळ खरेतर मूळचा इंग्लंडमध्ये सुरु झाला असला, तरी भारतामध्ये मात्र या खेळाची लोकप्रियता कदाचित इंग्लंडहूनही तसूभर अधिकच आहे.

या खेळाचा पहिला वाहिला आंतरराष्ट्रीय सामना १५ मार्च १८७७ साली ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथील मैदानावर खेळण्यात आला असून, हा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये खेळला गेला. ही टेस्ट मॅच असून, या खेळामध्ये सुरुवातीपासूनच मुरलेल्या इंग्लंडच्या संघाचा, या खेळाची नुकती कुठे तोंडओळख होत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने ४५ धावांनी पराभव केला होता. या टेस्ट मॅचची खासियत अशी, की हा सामना सर्व गाडी बाद होईपर्यंत खेळला गेला असून, त्यासाठी कोणती निश्चित समय सीमा नव्हती. दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन इनिंग्ज खेळायच्या आणि सर्व खेळाडू बाद होईपर्यंत इनिंग्ज खेळली जावी असा या सामन्याचा नियम होता.

त्याकाळी विना टप्पा बाउन्ड्री पार करणाऱ्या चेंडूवर पाच रन्स मिळत असत. आता याच बाउन्ड्रीपार जाणाऱ्या चेंडूवर आताच्या क्रिकेटच्या नियमांच्या अनुसार सहा रन्स दिल्या जातात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात जरी १८७७ साली झाली असली, तरी नव्या नियमांच्या अनुसार पहिली ‘सिक्सर’ पाहण्याचा मोका दर्शकांना तब्बल २१ वर्षांच्या नंतर मिळाला. ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन जो डार्लिंग या खेळाडूने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वप्रथम सिक्सर मारली असून, त्याने लागोपाठ तीन सिक्सर मारल्याने ऑस्ट्रेलियन संघाचा या सामन्यामध्ये विजय झाला होता.

Leave a Comment