या मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतदान करणार एकाच मतदाता

arunachal-pradesh
एखाद्या पक्षाला बहुमत मिळविण्यासाठी त्या पक्षाला मिळणाऱ्या प्रत्येक मताला किंमत आहे. त्यामुळे लोकतंत्रामध्ये एका मताला देखील अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणूनच निवडणुका घोषित झाल्या की मतदानाच्या हक्कापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोग देखील दक्ष असतो. म्हणूनच अरुणाचल प्रदेशमध्ये ह्युलीयांग क्षेत्रातील मालोगाम या ठिकाणी केवळ एकच मतदाता असला, तरी त्याला मत देता यावे यासाठी खास अस्थायी मतदान कक्ष तयार करण्यात येत आहे. या मतदान कक्षामध्ये येऊन एकुलती एक महिला मतदाता अकरा एप्रिल रोजी मतदान करणार असल्याचे समजते.

गेल्या वेळी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळी याच मतदार संघातून दोन व्यक्तींनी मतदान केले असून, समस्त देशभरामधले हे सर्वात लहान पोलिंग स्टेशन आहे. अरुणाचल प्रदेशातील पूर्व लोकसभा क्षेत्रामध्ये हे पोलिंग स्टेशन असून, मालोगाम विधानसभा क्षेत्रामधील या पोलिंग स्टेशनवर एकच मतदार मतदान करणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्याने म्हटले आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका अकरा एप्रिल रोजी होणार असून, आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व राजकीय पक्षांना या बाबतीत सूचना दिली असल्याचे सांगण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये अकरा एप्रिल रोजी एकूण २२०२ पोलिंग बुथ्स वर ७,९४,१६२ मतदार मतदान करणार असून, यामध्ये ४,०१,६१० महिला मतदारांचा समावेश आहे.

Leave a Comment