मोदींनी ‘मै भी चौकीदार’ म्हणत केला निवडणूक प्रचाराचा शुभारंभ

narendra-modi
नवी दिल्ली – शनिवारी ‘मैं भी चौकीदार हूं’ हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी २०१९ लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला आहे. तुमचा चौकीदार देशसेवेसाठी उभा असल्याचे ट्विट मोदींनी केले आहे. त्याचबरोबर या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी मी एकटा नाही तर तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात, असा संदेशही दिला आहे.


मोदींनी पुढे म्हटले की, भ्रष्टाचार, घाण आणि सामाजिक दुष्परिणमांविरूद्ध लढणारा मी चौकीदार आहे. मला यासाठी तुम्हा सर्वांची साथ हवी आहे. जो देशाच्या सेवा आणि प्रगतीसाठी कठोर परिश्रम करतो, तो प्रत्येकजण चौकीदार आहे. ३ मिनिटे ४५ सेकंदाचा हा व्हिडीओ मोदींनी शेअर केला असून, देशात केलेल्या विकास कामांचा थोडक्यात आढावा यामध्ये दिला आहे.

Leave a Comment