हॉलिवूडपट अॅवेंजर्स -एंडगेमचा हिंदी ट्रेलर रिलीज

avengers
लवकरच कॅप्टन मार्वेलच्या एव्हेंजर्स सीरिजच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपणार असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला या सीरिजचा सर्वात मोठा हॉलिवूडपट अॅवेंजर्स -एंडगेम येणार आहे. पण त्यापुर्वी हिंदीतील या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अवघ्या काही तासांपूर्वी रिलीज झालेला ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असल्यामुळे या ट्रेलरला कमी अवधीत मोठ्या प्रमाणावर व्ह्युज मिळाले आहेत.

जिथून मार्वेलच्या सुपरहिरोची गोष्ट सुरु होते अॅवेंजर्स-एंडगेमच्या ट्रेलरला खऱ्या अर्थाने तेथूनच सुरुवात होताना दिसते. या ट्रेलरमध्ये एका गुफेत बनलेला आयर्नमॅन आणि एका इंजक्शनमुळे डीएनएत बदल होऊन धालेला कॅप्टन, त्याप्रमाणेच अमेरिका आणि अन्य ग्रहावरुन आलेले थोर, हॉक आय, ब्लॅक विडो दिसत आहेत. हे सारे आजही सुपरहिरोज जगात असून ते सारे जण आपल्या मित्रांच्या मृत्यूनंतर एकजूट होतात. त्यांना त्यातच कॅप्टन मार्वेलची साथ मिळते. या ट्रेलरची रंगत या सगळ्यामुळे वाढली आहे. २ मिनीटे २८ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये रुसो ब्रदर्सने जणू संपूर्ण चित्रपट दाखविला आहे. लवकरच भारतात ‘अ‍ॅवेंजर्स- एंडगेम’चे प्रमोशन होणार असून या प्रमोशनसाठी चित्रपटाचे दिग्दर्शक जो रूसो भारतात येणार आहेत. येत्या २६ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment