मी काय घालावे हे सांगणारा सैफ अली कोण ?

kareena
बॉलीवूडची बेबो अर्थात करिना कपूर मालदिवला मुलगा तैमूर व पती सैफ अली खानसोबत सुट्ट्या एन्जॉय करायला गेली होती. आता ती सुट्ट्या एन्जॉय करुन परतली असून त्यानंतर तिने सोशल मीडियावर अपलोड केलेल्या फोटोमुळे तिला आणि सैफला ट्रोल करण्यास सुरुवात केली. कारण तिने बिकनी घातलेले फोटो सोशल मीडियावर टाकले होते. तिच्यासोबतच सैफला नेटकऱ्यांनी तुझी बायको बिकनी घालते, तुला लाज वाटत नाही का? असे म्हणत ट्रोल केले. त्यानंतर करिनाच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली आणि ती नेटकऱ्यांवर वैतागली. तिने यावर प्रतिक्रिया देताना मी बिकनी घातली पाहिजे की नाही हे मला सांगणार सैफ कोण ? असे म्हटले आहे.
kareena1
करिना नुकतीच अरबाज खानच्या ‘क्विक हिल पिंच’ या नव्या चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. करिनाला या कार्यक्रमामध्ये तिच्या फोटोंवरील लोकांच्या काही कमेन्ट्स वाचून दाखवण्यात आल्या. अनेकांनी या कमेन्टसमध्ये करिनाला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केले होते. यापैकी एक कमेंट अरबाजने वाचली आणि बेबोची सटकली.
kareena2
या कमेंटमध्ये तुझी बायको बिकनी घालते, तुला लाज वाटत नाही का? असा प्रश्न करण्यात आला होता. ही कमेन्ट अरबाजने वाचून दाखवताच बेबोच्या चेह-यावरचे भाव बदलले. ती कमालीची संतापली. मी बिकीनी घालावी की नाही हे सांगणार सैफ कोण? तू बिकनी का घातली किंवा हे असे का केले, असे सैफने मला विचारले, असे आमचे नाते नाहीच. माझ्यामते, आम्हा दोघांचेही नाते प्रगल्भ आहे. त्याला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी बिकनी घातली असेल तर त्यामागे नक्कीच कारण असणार,’असे करिना यावेळी म्हणाली.

Leave a Comment