युट्यूबने व्हिडीओ डीलीट केला म्हणून 5310 किमी प्रवास करुन गुगलच्या कार्यालयात पोहचला बेसबॉलपटू

google
कॅलिफोर्निया – एका तरुणाला युट्यूबवर त्याचा ऑनलाइन चॅनेल आणि व्हिडिओ न सापडल्यामुळे नाराज झालेल्या युवकाने तोडफोड करण्यासाठी चक्क गुगलच्या कार्यालयात दाखल झाला. 33 वर्षीय कायली लॉन्ग मुख्य शहरापासून 3300 माईल (5310.8352 किमी) प्रवास करुन गुगलच्या कार्यालयात पोहचला. त्याच्या कारमध्ये त्यावेळी 3 बेसबॉल बॅट होत्या त्या पोलिसांनी जप्त केल्या.

पोलिसांनी सांगितले की, कायली याने युट्युब चॅनलसंदर्भात गुगलच्या अधिकाऱ्यासोबत एक मीटिंग मागितली होती. तसे न झाल्यास त्याने हिंसाचाराची धमकी दिली होती. कायलीला विश्वास होता की त्याच्या कल्पनेने युट्यूबवरील व्हिडीओच्या माध्यमातून हजारो डॉलर मिळतील अशी आशा होती, पण तो व्हिडीओ न मिळाल्याने तो भडकला आणि त्याने गुगलच्या अधिकाऱ्यांसोबत भेटण्याची योजना बनवली होती.

कायलीच्या नातेवाईकांचे याबाबत असे म्हणणे आहे की, त्याचा हा व्हिडीओ युट्यूबने नव्हे तर त्याच्या पत्नीने डिलीट केला होता. तिन असे तिच्या पतीचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्यामुळे केले. कायली हा पहिला देखील मानसिक रोगी होता. कायलीचा तो व्हिडीओ पाहुन त्याच्या पत्नीने असे म्हटले होते, की गुगलने हा व्हिडीओ डिलीट केला पाहिजे.

मागील वर्षी एप्रिलमध्ये देखील असे प्रकरण समोर आले होते. त्यावेळी सॅन डिएगोची नसीम अगदम नामक महिला सॅन ब्रुनोतील गुगलच्या मुख्य कार्यालयात गोळीबार केला होता. त्यावेळी या गोळीबारात 3 लोक जख्मी झाले होते आणि अगदमने आत्महत्या केली होती. तिचे असे म्हणणे होते की युट्यूबने अॅनिमल राईट्स संर्दभातील तिच्या व्हिडीओला चुकीच्या पद्धतीने सेन्सॉर केले होते.

Leave a Comment