फक्त तुमच्यासाठी आहेत हे २०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे अनलिमिटेड प्रीपेड प्लॅन

plan
भारतीय टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने एंट्री केल्यानंतर सुरु झाले प्लॅन वॉर अद्याप ही कायम आहे. रिलायन्स जिओचा धसका घेऊन देशातील इतर टेलिकॉम कंपन्यांनी देखील आपल्या प्रीपेड प्लॅनमध्ये कपात करत आपल्या ग्राहकांना टिकवण्याचा प्रयत्न केला. त्यात ते काही अंशी यशस्वी देखील झाले.

सध्याच्या घडीला देशातील मोबाईल युझर्ससाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे अनलिमिटेड प्लॅन उपलब्ध आहे. टेलिकॉम कंपन्या एकापेक्षा एक स्वस्त प्लॅन लाँच करत ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत. यामध्ये अनलिमेटेड कॉलिंगसोबत डेटाही दिला जातोय. सध्या प्रीपेड वापरणाऱ्यांना अनेक प्लॅनचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यातच आज आम्ही तुम्हाला बाजारात विविध कंपन्यांच्या 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनची माहिती तुम्हाला देणार आहोत.
plan1
आयडियाचा 199 रूपयांचा प्लॅन – आयडिया या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिडेट कॉलिंगसह दररोज 1.5 जिबी डेटा आणि 100 एसएमएस फ्री दिले जात असून या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे.
plan3
एअरटेलचा 199 रुपयांचा प्लॅन – या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 1.5 जिबी आणि 100 एसएमएस मोफत मिळणार आहेत. २८ दिवसांची याची वैधता आहे. त्यासोबत हा प्लॅन अॅक्टिवेट करणाऱ्या वापरकर्त्यांना एअरटेल टिव्ही प्रिमियर आणि जी५चे सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते.
plan2
व्होडाफोनचा 199 रूपयांचा प्लॅन – ग्राहकांच्या पसंतीस व्होडाफोनचा 199 रूपयांचा प्लॅन उतरला असून मोबाईल युझर्संना यामध्ये दररोज 1.5 जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस फ्री दिले जात आहेत. 28 दिवस या प्लॅनची वैधता आहे. हा प्लॅन घेणाऱ्या वापरकर्त्याला व्होडाफोन प्लेअॅपचे फ्री सब्सक्रिप्शनही मिळते.
plan4
जिओचा 198 रुपयांचा प्लॅन – रिलायन्स जिओच्या 28 दिवसांची वैधता असणाऱ्या या प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा आणि १०० एसएमएससोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. यासोबतच जिओ अॅपचा मोफत वापरही मिळणार आहे.

Leave a Comment