
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ओपन चॅलेंज दिले आहे. २०१९ ची लोकसभा निवडणूक मोदींच्यात हिंमत असेल तर पश्चिम बंगालमधून लढवावी असे आवाहन त्यांनी केले आहे. मोदींनी हा निर्णय घेतला तर नोटाबंदीप्रमाणे त्यांचे हे पाऊल अपयशी ठरेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
नरेंद्र मोदींना ममता दिदींचे ओपन चॅलेंज, निवडणूक पश्चिम बंगालमधून लढवावी
ममता बॅनर्जींनी पत्रकारांनी मोदी यांच्याशी संबंधित प्रश्न विचारल्यानंतर हे उत्तर दिले. कोणत्याही मतदारसंघातून कोणीही निवडणूक लढवू शकतो. लोकशाहीने दिलेला हा अधिकार आहे. वाराणसी मतदारसंघातून मी देखील निवडणूक लढवू शकते. पण ते बंगालमधून जर लढले तर त्यांची अवस्था नोटाबंदीसारखी होईल. जनतेच्या न्यायालयात त्यांना दंडित केले जाईल.
पुढे त्या म्हणाल्या, त्यांनी देशाचे नुकसान केले असल्यामुळे लोकांना त्यांना उत्तर द्वावे लागेल. पश्चिम बंगालमधून त्यांनी निवडणूक लढल्यास आम्हाला खूप आनंद होईल. त्यांना एका मतदारसंघाची जर भीती वाटत असेल तर त्यांनी सर्वच ४२ जागांवरुन निवडणूक लढवावी.
