धोनीच्या ‘या’ अदांवर सनी लिओन फिदा

sunny-leone
बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ म्हणजेच सनी लिओनला क्रिकेट खुप आवडते हे मोजक्याच लोकांना माहित आहे. नुकतेच तिने एका मुलाखती दरम्यान तिला आवडत असलेल्या क्रिकेटपटुच्या नावाचा उल्लेख केला आहे.

या मुलाखती दरम्यान तिला तिच्या आवडत्या क्रिकेटपटूबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने एकाच क्षणात महेंद्रसिंह धोनीचे नाव घेतले आणि धोनी का आवडतो यामागचे कारणही तिने सांगितले. धोनी आवडण्यामागचे सनीनं सांगिलेले कारणही खूप सुंदर होते. ती म्हणाली मला धोनी आवडतो कारण त्याच्याकडे एक खूप क्यूट मुलगी आहे. तो झिवासोबत अनेक फोटो शेअर करतो आणि ते दोघेही एकत्र खूप निरागस वाटतात.

धोनी माझा आवडता क्रिकेटपटू असण्याचे आणखी एक कारण म्हणजे तो एक परफेक्ट फॅमिली मॅन असल्याचे सनी पुढे म्हणाली. सध्या दोन टीव्ही शो सनी करत आहे. तसेच तिच्याकडे एक हिंदी आणि साऊथ चित्रपट आहेत. यापैकी हिंदी चित्रपट तिच्या प्रॉडक्शन बॅनरखाली बनत आहे. ‘सनी सिटी मीडिया अँड एंटरटेनमेंट’ नावाचे प्रॉडक्शन हाऊस सनीने सुरू केले असून ती निर्माती म्हणून तिच्या जबाबदाऱ्या एंजॉय करत आहे.

Leave a Comment