व्हिडीओ – विमानतळावर मुलाला विसरुन विमानात बसली आई, मग…

saudi-arebia
सौदी अरेबियाच्या एका प्रवासी विमानाला आपल्या प्रवास अर्ध्यावर सोडून विमानतळावर माघारी परतावे लागले. कारण या विमानात प्रवास करणारी एक महिला आपल्या मुलाला विमानतळाच्या वेटिंग रूम एरियामध्ये विसरून आली होती. विशेष म्हणजे या महिलेच्या आपला मुलगा सोबत नाही हे विमानाने उड्डाण घेतल्यावर लक्षात आले.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार सौदी एअरलाईन्सच्या एसव्ही 832 विमानाने मलेशियातील क्लालालंपूरसाठी जेद्दाहून उड्डाण भरले. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एक महिला विमानातील क्रूजवळ पोहोचली. महिला फारचा घाबरलेली होती. तिने सांगितले की, आपण आपल्या मुलाला विमानतळाच्या वेटिंग रूम एरियामध्येच आल्याचे त्या महिलेने सांगितले. विमानाच्या क्रू मेंबरने तात्काळ वैमानिकाशी संपर्क केल्यानंतर वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोल रूमला याबाबत माहिती दिली.

किंग अब्दुल अजील इंटरनॅशनल एअरपोर्टच्या डिपार्चर लाउंजमध्येच महिला आपल्या मुलाला विसरून आली होती. याचा व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे. ज्यात पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल रुमचे अधिकारी बोलत आहेत. यात पायलटच्या आवाजासोबतच त्या महिलेचा देखील आवाज येत आहे.

फ्लाइट नंबर कन्फर्म केल्यावर कंट्रोल रूममध्ये असलेल्या ऑपरेटरने त्याच्या दुसऱ्या सहकाऱ्याशी प्रोटोकॉलबाबत चर्चा केली. पुढे प्रवास करण्यास महिलेने नकार दिला होता. तसे ऑपरेटर्सना सांगण्यात आल्यामुळे विमान परत बोलवण्यात आले. त्यानंतर आई आणि मुलाची भेट कशी झाली याबाबत काही माहिती मिळाली नाही. आशा आहे की, दोघेही ठीक आणि सोबत असतील.

Leave a Comment