प्रार्थनेसाठी गेलेल्या महिलेचा अचानक झाला स्मृतीभ्रंश !

woman
घरातील एखादी व्यक्ती रात्री झोपी गेली आणि सकाळी उठल्यानंतर तिने घरातील कोणालाच ओळखले नाही, तर घरातील इतरांची परिस्थती काय होईल याची कल्पना आपण करू शकतो. काही महिन्यांपूर्वी एका महिलेच्या बाबतीत असाच काहीसा प्रसंग घडला आहे. अमेरिकेतील लुईसियाना मध्ये राहणाऱ्या ५१ वर्षीय किम डेनिकोला या महिलेला, चर्चमध्ये प्रार्थनासभेसाठी गेले असताना अचानक प्रचंड डोकेदुखी सुरु झाली. अखेरीस डोकेदुखी अजिबातच कमी न होता वाढू लागली, आणि इतकी वाढली की किमची शुद्ध हरपली. किम बेशुद्ध झाल्यानंतर तिच्या बरोबर असलेल्या इतरांनी तिच्या पतीला ऑफिसमध्ये फोन करून बोलावून घेतले.
woman1
किमचा पती चर्चमध्ये पोहोचल्यावर त्याने किमची अवस्था पहिली मात्र, त्याने ताबडतोब तिला घेऊन जवळच्या हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. हॉस्पिटलमध्ये भरती करून घेतल्यानंतर काही काळाने किमची डोकेदुखी नाहीशी झाली, आणि त्याचबरोबर नाहीशी झाली तिची स्मृती ! डोकेदुखी बरी झाल्यानंतर किमला तिच्या पूर्वायुष्याचा साफ विसर पडला होता. या नंतर डॉक्टरांनी किमची तपासणी केल्यांनतर किमला ‘ट्रान्जियंट ग्लोबल अम्नेशिया’ असल्याचे निदान वैद्यकीय तज्ञांनी केले. आता किमची आठवण, ती अठरा वर्षांची असतानाची आहे. त्यानंतर काय घडले याचा किमला साफ विसर पडला असल्याने अलीकडच्या काळामधील घटना किमला अजिबात आठवत नाहीत. इतकेच नव्हे, तर किम आपला पती डेव्हिड यालाही विसरली आहे.
woman2
किमला अचानक स्मृतिभ्रंश का झाला यामागचे नेमके कारण अद्याप डॉक्टर्सही सांगू शकलेले नाहीत. किमच्या या विकाराचे कारण जाणून घेण्यासाठी तिच्या मेंदूचे स्कॅन्स केले जात आहेत, तसेच तिच्यावर सातत्याने औषधोपचारही सुरु आहेत. किमचे परिवारजनही पूर्वी घेतलेली अनेक छायाचित्रे, व्हिडीयोज यांच्या माध्यमातून किमच्या पूर्वायुष्यातील आठवणी जाग्या करण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण अद्याप त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही.

Leave a Comment