31 मार्चपूर्वी हे काम न केल्यास निष्क्रीय होईल तुमचे पॅन कार्ड

pan-card
मुंबई : सध्याच्या घडीला आधार कार्डसोबतच नोकरी असो किंवा कुठला व्यवसाय पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. पॅन कार्डची आयकर फाईल करण्यापासून ते बँकेत खातं उघडण्यापर्यंत सर्वच कामांसाठी गरज असते. पण येत्या 31 मार्च 2019 पासून तुमचे हे पॅन कार्ड जर हे काम केले नाही तर निष्क्रीय होऊ शकते. तुम्ही 31 मार्चपूर्वी जर तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रीय होऊ शकते. तब्बल 19 कोटी पॅन कार्ड हे याअंतर्गत निष्क्रीय होऊ शकतात.

तब्बल 19 कोटी पॅन कार्ड हे 31 मार्चपूर्वी पॅन कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. तुम्ही जर अद्यापही हे काम केलेले नसेल तर भविष्यात तुम्हाला अडचण येऊ शकते. सरकारने गेल्या वर्षी असे 11.44 लाख पॅन कार्ड रद्द केले होते. जर 31 मार्चपर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड रद्द होऊ शकते.

आयकर कलम 139एए अंतर्गत जर आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक नसेल तर ते पॅन कार्ड अवैध मानले जाईल. पॅन कार्ड लिंक नसल्याने तुम्ही ऑनलाईन आयकर परतावा दाखल करु शकणार नाही. कर रिफंडमध्ये अडचण येऊ शकते. गेल्या वर्षी सरकारने करदात्यांना आयकर परतावा भरण्यासाठी आधार कार्डला पॅन कार्डशी लिंक करण्यास सांगितले होते. त्यानंतर याची अंतिम मुदत वाढवण्यात आली होती. पॅन कार्ड मार्च 2018 पर्यंत आधारशी लिंक करण्यास सांगण्यात आले. पण, आधार कार्ड संबंधित सर्वोच्च न्यायालयातील खटल्यामुळे याची 31 ऑगस्ट 2018 ठेवण्यात आली. त्यानंतर अंतिम तारखेत वाढ करत आता 31 मार्च 2019 पर्यंत आधार कार्डला पॅन कार्डशी लिंक करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment