लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात बी. जी. कोळसे पाटील

bg-kolse-patil
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील हे उतरले असून बी. जी. कोळसे पाटील हे वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असतील. औरंगाबादमधील सभेत कोळसे पाटलांच्या उमेदवारीची वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: घोषणा केली. वंचित बहुजन आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असेलल्या एमआयएमने माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचीही चर्चा आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील हे मूळचे आहेत. पुण्यातून त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि गुन्हेगारी कायदा यात विशेष अभ्यास केला. पुढे वकिली करत कायद्याच्या क्षेत्रात ते एक एक पाऊल पुढे टाकत गेले. 1990 साली मुंबई उच्च न्यायालयातून न्यायमूर्ती म्हणून निवृत्त झाले.

बी. जी कोळसे पाटील यांनी न्यायमूर्ती म्हणून निवृत्त झाल्यानंतर ‘लोकशासन आंदोलन’ अशी चळवळ सुरु केली आणि सामाजिक, पर्यावरण, मानवी हक्क इत्यादी विषयांसंबंधी आंदोलने, जनजागृती करण्यास सुरुवात केली. बी. जी. कोळसे पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे टीकाकार आणि विरोधक आहेत. आरएसएसच्या विचारसरणीला ते आपल्या मांडणीतून वैचारिक विरोध करत आले आहेत.

Leave a Comment