एकवेळ हत्या करेन, पण खेळाशी गद्दारी करणार नाही – धोनी

dhoni
मुंबई – याच महिन्याच्या 23 तारखेपासून आयपीएलच्या आगामी हंगामीची सुरुवात होणार आहे. दरम्यान आयपीएलच्या आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्सचे सर्वात यशस्वी संघ म्हणून नाव घेतले जाते. सर्वात यशस्वी संघ चेन्नईला बनवण्याचे श्रेय हे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दिले जाते. पण २०१६ आणि २०१७ साली स्पॉट फिक्सिंगच्या कारणामुळे चेन्नईच्या संघाला निलंबित करण्यात आले होते. या विषयावर आता धोनीने प्रथमच बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.


२० मार्चपासून आयपीएलच्या पूर्वसंध्येला धोनीवर एक डॉक्यूमेंट्री रिलीज होत आहे. धोनी रोअर ऑफ दी लायन या डॉक्यूमेंट्रीच्या सुरुवातीलाच म्हणतो, की माझ्यासाठी सर्वात मोठा अपराध हत्या करणे नाही तर, मॅच फिक्सिंग ठरेल. धोनी ४५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये म्हणतो, मॅच फिक्सिंगमध्ये संघ सहभागी होता. माझ्यावरही आरोप झाले होते. हा आम्हा सर्वांसाठी कठीण काळ होता. पुनरागमन करतानाचा क्षण चाहते आणि आमच्यासाठी खूप भावूक होता. याआधीही मी म्हटले आहे, ज्या गोष्टीमुळे तुमचा मृत्यू होत नाही, ती गोष्ट तुम्हाला मजबूत बनवते.

चेन्नईच्या खेळाडूंना स्पॉट फिक्सिंगमुळे दुसऱ्या संघांकडून २ वर्षे खेळावे लागले होते. २ वर्ष महेंद्रसिंह धोनी रायझिंग पुणे सुपरजाएंट्स संघाकडून खेळला. पहिल्यावर्षी खराब कामगिरी झाल्यामुळे धोनीला कर्णधारपदावरून हटवण्यात आले. त्याच्याऐवजी स्मिथला कर्णधार करण्यात आले होते. यावरुन बरीच चर्चा रंगली होती. चेन्नईच्या संघाने जोरदार पुनरागमन करताना धोनीच्या नेतृत्वात गेल्यावर्षी आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.

Leave a Comment