कॉंग्रेसतर्फे सलमान खान इंदोर तर प्रियांका भोपाल मधून रिंगणात

indore
लोकसभा निवडणूक तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांचे बॉलीवूड सेलेब्रिटी प्रेम उफाळून येऊ लागल्याचे दिसून आले आहे. कॉंग्रेसतर्फे दबंग खान म्हणजे सलमानला मध्यप्रदेशातील इंदोर येथून उमेदवारी दिली जावी अशी मागणी स्थानिक नेत्यांकडून केली गेली असून मुखमंत्री कमलनाथ यांनीही त्यासाठी अनुकुलता दर्शविली असल्याचे समजते.

या मतदारसंघातून भाजपच्या नेत्या आणि लोकसभेच्या स्पीकर सुमित्रा महाजन विक्रमी ८ वेळा विजयी झाल्या आहेत. या मतदारसंघातून रामायण फेम राम अरुण गोविल यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार असल्यची चर्चा होती. मात्र मुख्यमंत्री कमलनाथ यांना सलमान अधिक योग्य उमेदवार वाटतो आहे. त्यांनी सलमानला यापूर्वीच मध्यप्रदेश पर्यटन विभागाचा सदिच्छा दूत नेमले आहे. शिवाय सलमानचे वडिलोपार्जित घर येथे असून त्याचा जन्म इंदोर मध्येच झाला आहे. सलमानच्या मदतीने इंदोरवर पुन्हा कब्जा करण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्नशील असल्याचे समजते.

इंदोर मधून सलमानच्या उमेदवारीची मागणी होत असतानाच कॉंग्रेस उत्तरप्रदेशच्या महासचिव प्रियांका गांधी यांना भोपाळ मधून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जात आहे. सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक रिंगणात आहेत तर राहुल अमेठी सोडणार नाहीत. त्यामुळे प्रियांका यांना भोपाल मधून उतरवावे असे प्रयत्न सुरु आहेत असे समजते.

Leave a Comment