शेतकरी शेळ्या-मेंढ्या हाकण्यासाठी करीत आहेत ड्रोनचा वापर

drone
मनुष्याचे शारीरिक कष्ट कमी करण्यासाठी अनेक यंत्रांचे शोध लावण्यात आले, आणि मनुष्याचे जीवन सुकर झाले. आताच्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या काळामध्ये मनुष्याची जागा आता रोबोट्सने घेतली आहे. हॉटेलमध्ये जेवण सर्व्ह करण्यापासून हॉस्पिटल्समध्ये पेशंट्सना फ़िजिओथेरपी देण्याचे काम आता रोबोट्स करीत आहेत. न्यूझीलंडमध्ये मात्र ही प्रगती या ही पुढे एक पाउल असून, आता शेळ्या-मेंढ्या हाकण्यासाठी शेतकरी मंडळी ड्रोन्सची मदत घेत आहेत. पूर्वी शेतकरी शेळ्या-मेंढ्या, गाई-गुरे चरण्यासाठी नेत असताना या शेळ्या-मेंढ्या हाकण्यासाठी खास तसे प्रशिक्षण दिलेले राखणदार कुत्रे मेंढपाळांच्या सोबत असत. या राखणदार कुत्यांयाच्या जोडीने ही जबाबदारी आता आधुनिक ड्रोन्सने घेतली आहे.
drone1
विशेष गोष्ट अशी, की या ड्रोन्समधून कुत्र्यांच्या भुंकण्याप्रामाणे मोठा आवाज ही येण्याची सोय केली गेली आहे. ‘डीजेआय मेविक एन्टरप्राईज’ या कंपनीने तयार केलेल्या या ड्रोनची किंमत साडे तीन हजार डॉलर्स असून, हे ड्रोन शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. अनेकदा गायीगुरे, किंवा शेळ्या मेंढ्या हाकत असताना गायी-गुरे कुत्र्यांना अपाय करण्याच्या अनेक घटना घडल्या असून आता नव्या ड्रोनमुळे ही समस्या संपुष्टात आली असल्याचे काहींचे म्हणणे आहे. तसेच ड्रोन कुत्र्यांच्या मानाने जलद वेगाने हालचाल करीत असल्याने अधिक उपयोगी असल्याचे शेतकरी मंडळींचे म्हणणे आहे. आता शेतकऱ्यांच्या राखणदार कुत्र्यांनाही या ड्रोन्सची सवय होऊ लागली आहे.
drone2
पण केवळ गाई-गुरे हाकणे एवढ्याच कामासाठी हे ड्रोन उपयोगी नाही, तर घरबसल्या शेताकडे लक्ष ठेवणे ही या ड्रोनमुळे शक्य होत आहे. शेतामध्ये पाणी कितपत आणि किती वेळाने देण्याची आवश्यकता आहे, किंवा प्राण्यांच्या नकळत त्यांच्यावर नजर ठेवणे या कामांमध्ये ही हे ड्रोन सहायक ठरत आहे. अनेक शेतकऱ्यांची शेते डोंगराळ भागामध्ये असल्याने शेतावर नजर ठेवण्यासाठी सतत पायपीट करण्याचे कष्टही या ड्रोनमुळे वाचले आहेत. तसेच ड्रोन जमिनीपासून अगदी कमी उंचीवर उडू शकत असल्यामुळे याद्वारे पाठविण्यात येणारी छायाचित्रे अतिशय स्पष्ट असतात. हवामान खराब असल्याने शेतकरी शेतामध्ये येऊ शकत नसले तरी ड्रोनच्या द्वारे शेतावर आणि पाळीव जनावरांवर लक्ष ठेवता येणे शक्य झाल्यामुळे शेतकरी मंडळींच्या कामाचा भार पुष्कळच हलका झाला आहे.

Leave a Comment