बकरी बनली व्हार्मोंटमधील फेअर हेवन गावाची महापौर

goat
तीन वर्षांची लिंकन नामक बकरी अमेरिकेतील व्हर्मोंटमधील फेअर हेवन गावाची महापौर म्हणून निवडून आल्याचे वृत्त ‘रूटलंड हेराल्ड’ वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. लिंकन एका वर्षासाठी महापौरपदी राहणार असून येत्या वर्षामध्ये गावात आयोजित होणाऱ्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना लिंकन उपस्थित राहणार असल्याचे समजते. महापौर पदासाठी खास आयोजित केलेल्या निवडणुकीमध्ये लिंकन, सॅमी नामक कुत्र्याचा तीन मतांनी पराभव करून महापौरपदी निवडून आल्याचे समजते.
goat1
फेअर हेवन या गावामध्ये महापौरपदासाठी निवडणूक प्राणीच लढवीत असल्याची आगळी परंपरा आहे. या निवडणुकीमध्ये स्थानिक नागरिकांचे पाळीव प्राणी सहभागी होत असून, मोठ्या माणसांपासून शाळकरी मुलांपर्यंत सर्वांनाच या निवणुकीमध्ये मतदान करण्याचा हक्क आहे. या द्वारे लोकशाहीचे महत्व मुलांना पटविता येणे शक्य झाले असून, मत देताना विचारपूर्वक देणे आणि योग्य उमेदवाराची निवड करण्याची विचारशक्तीही मुलांमध्ये विकसित होत असल्याचे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे महापौरपदाचा कालावधी एकाच वर्षाचा असल्याने दर वर्षी नवीन प्राण्याला ही संधी मिळत असल्याचेही या वृत्तामध्ये म्हटले

Leave a Comment