धोनीने पुन्हा एकदा सिद्ध केले पंगा घ्यायचा नाय

dhoni
शुक्रवारी रांची क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा तिसरा सामना खेळला जात आहे. भारतीय संघाने या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने 313 धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेल हा धावबाद झाला. जडेजाच्या शानदार क्षेत्ररक्षणासोबतच धोनीच्या चपळाईमुळे तो धावबाद झाला.


खरं तर, ऑस्ट्रेलिया संघासाठी कुलदीप यादव 42 वे षटक टाकत होता. त्याच्या या षटकातील सहाव्या चेंडूवर शॉन मार्श स्ट्राइकवर होता. शॉन मार्शने कव्हरकडे चेंडू टोलावला आणि एक धाव काढण्यासाठी सरसावला. त्याचवेळी शॉर्टकव्हरवर क्षेत्ररक्षणासाठी तैनात असलेल्या रविंद्र जडेजाने तो चेंडू आडवला आणि तो धोनीकडे फेकला. त्यानंतर धोनीने जी कमाल दाखवली ती अविश्वसनीय होती. धोनी आलेला चेंडू आपल्या ग्लोव्हजमध्ये न घेता सरळ स्टम्पवर सोडला. त्यामुळे मॅक्सवेल धावबाद झाला. मॅक्सवेलने 31 चेंडूत 47 धावा चोपल्या होत्या.

Leave a Comment