VIDEO: पुलवामातील शहिद जवानांच्या सन्मानार्थ टीम इंडियाने घातल्या आर्मी कॅप्स

team-india
रांची – पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या सन्मानार्थ भारतीय क्रिकेट संघ आज रांचीमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय सामन्यात आर्मी कॅप्स घालून खेळत आहे. टॉस करण्यापूर्वी, या कॅप्सचे वाटप महेंद्रसिंह धोनीने टीम इंडियातील प्रत्येक सदस्याला केले.


बीसीसीआयने भारतीय लष्कराच्या पराक्रम, बलिदान आणि धैर्याला सन्मानित करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. टॉसच्या वेळीच विराटने सांगितले की, संघाचे सर्व खेळाडू आजच्या सामन्याचे जे मानधन मिळणार आहे, ते आम्ही शहिद जवानांच्या कुटुंबियाच्या मदतीसाठी देणार आहोत.

Leave a Comment