धोनीच्या फार्म हाऊसवर टीम इंडियासाठी ‘लिट्टी-चोखा’ पार्टी

dhoni
रांची : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने रांची या छोट्याश्या शहराला ओळख मिळवून दिली. दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना रांची खेळवला जाणार आहे. त्यातच धोनीचा आपल्या शहरातील वावर खुपच दिलखुलास होता. त्याने आपल्या हमर गाडीतून केदार जाधव आणि रिषभ पंत यांना रांचीची सफर देखील घडवली. त्यातच आता त्याने टीम इंडियासाठी खास ‘लिट्टी-चोखा’ पार्टी दिल्याचेही समोर आले आहे.

धोनीने आपल्या सात एकराच्या फार्म हाऊसमध्ये बुधवारी रात्री टीम इंडियाला पार्टीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी ‘लिट्टी-चोखा’ पार्टीमध्ये खास पदार्थ होता. ‘लिट्टी-चोखा’हा पदार्थ उत्तर प्रदेश, झारखंड या भागांमध्ये प्रसिद्ध असल्यामुळे धोनीनेही या पार्टीमध्ये ‘लिट्टी-चोखा’ हा पदार्थ ठेवला होता.

Leave a Comment