सोशल मीडियात व्हायरल होत आहे कार्तिक-साराचा ‘लिपलॉक’ करतानाचा व्हिडीओ

combo
काही दिवसांपूर्वीच ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये अभिनेता कार्तिक आर्यनवर क्रश असल्याचे बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने सांगितले होते. कार्तिकनेही यानंतर साराला डेट करण्याची तयारी दर्शवली होती. पण नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे दोघेही एकमेकांना डेट करत आहेत का?, अशी चर्चा सुरु आहे. सारा आणि कार्तिक या व्हिडीओमध्ये लिपलॉक किस करताना दिसत आहेत.


सोशल मीडियावर कार्तिक-साराचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. पण तुमच्या मनात काही प्रश्न उठण्याच्या आतच आम्ही तुम्हाला सांगतो की हा व्हिडीओ त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यतला नसुन हा व्हिडीओ त्यांच्या आगामी ‘लव्ह आज कल 2’ चित्रपटामधील शूटिंगचा असल्याची माहिती समोर आली आहे. कार्तिक आणि सारा इम्तियाज अली दिग्दर्शित ‘लव्ह आज कल-2’ मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कार्तिक आणि सारा रोमँटिक गाण्यावर डान्स करत लिपलॉक किस करताना दिसत आहेत.

Leave a Comment