गुगलने लाँच केले नवे अॅप बोलो

bolo
तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज गुगलने बुधवारी नवीन अॅप लाँच केले आहे. बोलो नावाचे हे अॅप प्राथमिक शाळेतील मुलांना हिंदी आणि इंग्रजी भाषा शिकण्यासाठी उपयुक्त आहे. हे अॅप भारतात सर्वप्रथम लाँच केले गेले असून गुगल प्लेस्टेशनवर ते फ्री उपलब्ध आहे.

हे अॅप स्पीच रेक्ग्नेशन व टेक्स्ट टू स्पीच तंत्रज्ञानावर काम करते. त्यात दिया नावाचे एक अॅनिमीटेड कॅरेक्टर असून ते मुलांना गोष्टी वाचण्यास प्रोत्साहित करते. जेथे शब्दाचा उच्चार अडेल तेथे ते मदत करते. तसेच मुलांनी गोष्ट पूर्ण वाचावी म्हणून प्रेरणा देते. गुगल इंडियाचे प्रोडक्ट मॅनेजर नितीन कश्यप म्हणाले, या अॅपचे डिझाईन असे केले गेले आहे कि ते ऑफलाईन काम करू शकते.

या अॅप मध्ये १०० हिंदी इंग्रजी गोष्टी आहेत. अँड्राईड कीटकॅट ४.४ व त्यापुढच्या सर्व व्हर्जनवरील डिव्हाईस वर ते चालू शकते. उत्तर प्रदेशातील २०० गावात या अॅपच्या चाचण्या घेतल्या गेल्या असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच बंगाली सह अन्य भाषांसाठी ते उपलब्ध केले जाणार आहे.

Leave a Comment