प्रवास करीत असताना ही लक्षणे जाणविल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला आवश्यक

attack
प्रवास करीत असताना अचानक एखाद्या यात्रेकरूला ह्रदयविकाराचा झटका आल्याच्या अनेक घटना आपण वाचत-ऐकत असतो. सुदैवाने काहींच्या बाबतीत त्वरित वैद्यकीय उपचार मिळणे शक्य झाल्याने त्यांचे प्राण वाचू शकले, तर काही मात्र दुर्दैवी ठरले. हृद्यविकाराचा झटका येण्याआधी आपले शरीर आपल्याला तशी सूचना देण्याचा प्रयत्न करीत असते. पण अनेकदा आपले शरीर आपल्याला देत असलेल्या सूचना आपण ओळखू शकत नाही. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्वरित वैद्यकीय मदत मिळाली नाही, तर हा झटका प्राणघातकही ठरू शकतो.
attack1
प्रवास करीत असताना तर ही जोखीम आणखी जास्त असते. त्याचबरोबर आपण प्रवास करीत असताना वैद्यकीय मदत सहज उपलब्ध होईलच असे नाही. त्यामुळे शरीरामध्ये घडून येणारे किरकोळ बदल देखील दुर्लक्षित न करणे इष्ट ठरते. हृद्यविकाराचा झटका येण्याच्या काही काळापूर्वी शरीरामध्ये त्याची काही लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे दिसून आल्यास त्यांकडे दुर्लक्ष न करता सहप्रवाश्यांना याबद्दल कल्पना देऊन त्वरित वैद्यकीय मदत मागविण्यासंबंधी सूचना द्यावी.
attack2
अचानक छातीमध्ये, मानेत, पाठीत, पोटामध्ये किंवा खांद्यांमध्ये सुरु झालेली तीव्र वेदना जर वीस मिनिटांपेक्षा अधिक काळ राहिली, तर त्याची सूचना त्वरित सहप्रवाश्यांना देऊन वैद्यकीय मदत मागवावी. ही लक्षणे हृदयविकाराचा झटका येणार असल्याची असू शकतात. लांबचा प्रवास असेल, तर या प्रवासाच्या दरम्यान पायांचे स्नायू आखडणे, शरीरामध्ये पाण्याची कमतरता होणे, शरीरामध्ये इलेक्ट्रोलाईट्सचे असंतुलन, शारीरिक थकवा, गाडी लागणे या सर्व गोष्टी गंभीर स्वरूप धारण करू शकण्याची शक्यता असून याचे परिमार्जन हृदय विकाराच्या झटक्यामध्ये होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारची कुठलीही समस्या उद्भविल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तींना उच्चरक्तदाब, मधुमेह किंवा हृदयाशी निगडित विकार आहेत त्यांनी प्रवासाच्या दरम्यान अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ञ म्हणतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment