दुबईतील शेखने बनविली जगातील सर्वात मोठी एसयूव्ही

SUV
भारतामध्ये ‘एसयूव्ही’ या वर्गामध्ये समाविष्ट असलेल्या चारचाकी गाड्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वच नामांकित कंपन्या या वर्गाच्या गाड्या बाजारामध्ये आणत आहेत. अशा वेळी दुबई मधील शेख हमद बिन हमदान अल नाह्यान या धनाढ्य शेखने त्याला ‘एसयूव्ही’ गाड्यांबद्दल वाटणारे कमालीचे आकर्षण सिद्ध करीत जीपच्या ‘रँग्लर-डॉज डार्ट’ आणि ‘ओश्कोश एम १०७५ मिलिटरी ट्रक’ या दोन्ही वाहनांचे संमिश्रण करीत एकच विशालकाय दहा चाकी एसयूव्ही तयार केली आहे.

(व्हिडीओ सौजन्य – VIRAL FUN 2018)
शेख हमदानने या एसयूव्हीचे नाव ‘धाबियान’ ठेवले असून, या गाडीची लांबी १०.८ मीटर, तर रुंदी २.५ मीटर आहे. या गाडीची जमिनीपासून उंची ३.२ मीटर असून, या गाडीचे वजन तब्बल २४ टन आहे. ‘धाबियान’मध्ये सहाशे हॉर्सपावरचे १५.२ लिटर्सचे ‘कॅटरपिलर C15’ इंजिन लावले गेले आहे. या एसयूव्हीची अनेक छायाचित्रे शेख हमदान यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केली असून, वाळवंटामध्ये देखील ही गाडी अतिशय सहज धावू शकत असल्याने याला जगातील सर्वात मोठी एसयूव्ही असण्यासोबत ‘डेझर्ट शिप’ असा लौकिकही प्राप्त झाला आहे.
SUV1
ही एसयूव्ही तयार करण्यासाठी किती रक्कम खर्च झाली, किंवा या गाडीचा ‘परफॉर्मन्स’ कसा आहे यावर अद्याप कोणतीही माहिती प्रसिद्ध करण्यात आली नसून सध्या ही गाडी अबू धाबी येथील एमिरेट्स नॅशनल ऑटो म्युझियम येथे प्रदर्शित करण्यात आली आहे.

Leave a Comment