रणवीर सिंह म्हणतो, शहीदांच्या कुटुंबियांची इच्छा असेल तर पाक कलाकारांवरील बंदी योग्यच

ranveer-singh
जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले. या घटनेचा देशभरातील सर्वसामान्य नागरिकांसोबत सिनेसृष्टीनेदेखील तीव्र निषेध करत संताप व्यक्त केला. त्याचबरोबर सिनेसृष्टीने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचा मागणी केली. अनेक कलाकारांनी या मागणीचे समर्थन केले, तर काहींनी या विषयी बोलणे टाळले आहे. त्यातच बॉलीवूडचा बाजीराव अर्थात अभिनेता रणवीर सिंह याने कलेच्या आणि राजकारणाच्या सीमा वेगळ्या असायला हव्यात, असे म्हटलं आहे.

त्याचबरोबर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी असावी अशी जर शहीद जवानांच्या कुटुंबियांची इच्छा असेल तर माझा त्यांना पाठिंबा असल्याचे रणवीर म्हणाला. देशाच्या राजकारणाला सीमा असतात. पण या सीमा कला किंवा क्रीडा क्षेत्राला नसतात. त्यामुळे राजकारणाला कधीही कला किंवा क्रीडा क्षेत्राशी जोडू नये. कला, क्रीडा आणि राजकरण या गोष्टी कायम वेगळ्या ठेवायला हव्यात. पण जर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी असावी ही शहीद जवानांच्या कुटुंबियांची मागणी असेल तर मी या बंदीला कधीच विरोध करणार नाही, असे रणवीर म्हणाला.

Leave a Comment