‘बदला’द्वारे अमृता सिंहचे बॉलीवूडमध्ये पुनरागमन

amrita-singh
‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ या चित्रपटात दमदार अभिनय करुन अभिनेत्री अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी सारा अली खान हिने बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवले आहेत. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. अमृताने आपल्या मुलीच्या करिअरची गाडी रुळावर आणण्यासाठी सिनेसृष्टीपासून फारकत घेतली होती. पण आता तिचे करिअर सावरल्यानंतर अमृता सिंह पुन्हा एकदा सिनेसृष्टी पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नु यांचा क्राईम थ्रिलर ‘बदला’ हा चित्रपट येणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांची चित्रपटाच्या ट्रेलरवरून त्याबाबतची उत्सुकता वाढली आहे. पण चित्रपटात एक ट्विस्ट आहे ते म्हणजे या चित्रपटात अमृता सिंह देखील झळकणार आहे.

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, अमृता या चित्रपटात पंजाबी आईची भूमिका साकारणार आहेत. ‘२ स्टेट्स’ या चित्रपटातही त्यांनी पंजाबी आईची भूमिका साकारली होती. आता ‘बदला’मध्ये त्यांच्या भूमिकेची चाहत्यांना उत्सुकता आहे. ‘बदला’ चित्रपटातून तापसी पन्नु आणि अमिताभ बच्चन दोघेही पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करत आहेत. यापूर्वी त्यांनी ‘पिंक’ चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटातही ते वकिलाची भूमिका साकारणार आहेत.

Leave a Comment