राफेल बरोबरच भारताला हवी स्वीडनची फायटर जेट ग्रिफेन ई

grifen
भारतीय हवाई दल सातत्याने अधिक मजबुतीसाठी प्रयत्नशील असून नव्या फायटर जेट खरेदीसंदर्भात चोखंदळ आहे. या मुळेच फ्रांसची राफेल भारताला हवी आहेत तशीच स्वीडनची रक्षा प्रमुख कंपनी साबची सिंगल जेट फायटर ग्रिफेन इ भारताला खूपच उपयुक्त आहेत असे साब कंपनीचे म्हणणे आहे.

इंडस्ट्रीयल पार्टनरशिप बिझिनेस एरिका एरोनॉटीक्सचे उपाध्यक्ष मॅट पाल्सबर्ग या संदर्भात मीडियाशी बोलताना म्हणाले, भारताने फायटर जेट खरेदी संदर्भात ज्या कंपन्यांची विमाने विचारात घेतली त्यात फायटर जेट अपग्रेड करण्याची क्षमता असेलेली साब एकमेव कंपनी आहे. भारत ग्रिफेन इ विमाने खरेदीचा विचार नक्की करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

साब बरोबर अमेरिकेची मार्टिन लॉकहिड त्यांची एफ १६ विमाने भारताने खरेदी करावीत म्हणून प्रयत्नशील आहे. या कंपनीने भारतात उत्पादन करण्याची तयारी दाखविली आहे मात्र भारताने एफ १६ खरेदीची सक्ती भारतावर होणार नसेल तरच हा उत्पादन प्रकल्प भारतात सुरु करण्यास परवानगी मिळेल असे सांगितले होते असे समजते. त्यातून पाकिस्तानचे एफ १६ भारताच्या मिग २१ने पडल्याने ही विमाने घेण्यास भारत प्राधान्य देणार नाही असा तर्क केला जात आहे. अश्यावेळी ग्रिफेन इ चा विचार होऊ शकतो असे साब कंपनीचे म्हणणे आहे.

Leave a Comment