ही आहे जगातील एकमेव ‘हिप्नो-डॉग’

hypno
ब्रिटनमधील लीड्सची रहिवासी असणाऱ्या क्रिस्टीना लेनन या महिलेने आपल्या दहा वर्षीय जर्मन स्पिट्झ जातीच्या कुत्रीला हिप्नोसिसचे प्रशिक्षण दिले असून, आता इतरांना संमोहित करू शकणारी ‘प्रिन्सेस’ जागातील एकमेव हिप्नो-डॉग ठरली आहे. प्रिन्सेसने आजवर अनेक रियॅलिटी शोजमध्ये भाग घेतला असून, अनेक मोठ्या सेलिब्रिटीजना संमोहित करण्याचे यशस्वी प्रयोग प्रिन्सेसने केले असल्याचे वृत्त ब्रिटनच्या ‘केटर्स न्यूज एजन्सी’च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.
hypno1
प्रिन्सेसची मालकीण क्रिस्टीना स्वतः संमोहनतज्ञ असून, हे शास्त्र तिने आपली पाळीव कुत्री प्रिन्सेस हिला ही अवगत करविले आहे. आता स्वतःच्या संमोहन कौशल्याच्या बळावर प्रिन्सेस कोणत्याही व्यक्तीला संमोहित करून ‘ट्रान्स’मध्ये पाठवू शकत असल्याचे क्रिस्टीना सांगते. अलीकडे अमेरिकेमध्ये आयोजित एका रियॅलिटी शोमध्ये प्रिन्सेसने सुप्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री ड्र्यू बॅरिमोरला देखील यशस्वीरित्या संमोहित केले होते. प्रिन्सेसचे हे कौशल्य पाहून ड्र्यू देखील अचंबित झाल्याचे क्रिस्टीना म्हणते.
hypno2
प्रिन्सेस एखाद्या गोष्टीकडे एकटक बघत असताना तिची नजर अतिशय ‘इंटेन्स’ असल्याचे सांगून यावरूनच तिला संमोहन शास्त्र शिकविण्याचा प्रयोग करून पाहण्याची कल्पना आपल्याला सुचली असल्याचे क्रिस्टीना सांगते. २०१५ साली क्रिस्टीनाने प्रिन्सेसचे संमोहन कौशल्य ‘ब्रिटन हॅज गॉट टॅलेंट’ या सुप्रसिद्ध रियॅलिटी शोमध्ये प्रदर्शित केल्यानंतर प्रिन्सेसला प्रसिद्धी मिळाली. या शो मध्ये प्रिन्सेसने शोच्या जज मंडळींना यशस्वीरित्या संमोहित केले होते. त्यानंतर अनेक प्रसंगी प्रिन्सेसने अनेक नामवंत सेलिब्रिटीजना संमोहित केले असून जगातील एकमेव हिप्नो-डॉग हा लौकिक तिने संपादन केला आहे.

Leave a Comment