‘हिटमॅन’पेक्षाही ‘धाकड’ फलंदाज मुंबई इंडियन्सला भेटला

abhinav-singh
अवघ्या काही दिवसातच आयपीएलचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेतील तीन वेळाचा विजेता असलेल्या मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरुन आपल्या नव्या ‘धाकड’ फलंदाजाची ओळख करुन दिली आहे.


अभिनव सिंह या युवा खेळाडूने स्थानिक शालेय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत २६५ धावांची खेळी केली होती. त्याने यासह २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध रोहीतने एकदिवसीय सामन्यात केलेल्या २६४ धावांचा विक्रम मोडीत काढला. मुंबई इंडियन्सनने या पार्श्वभूमीवर ट्विटरवर अभिनवचा फोटो पोस्ट करत, रोहित शर्मापेक्षा चांगला खेळाडू आम्हाला भेटला असल्याचे म्हटले आहे. रोहितला या पोस्टमध्ये टॅग करण्यात आले असल्याने, कर्णधार रोहित याला कसे प्रत्युत्तर देतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. २३ मार्चपासून आयपीएलच्या बाराव्या मोसमाला सुरुवात होणार आहे. यात मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी २४ मार्चला होणार आहे.

Leave a Comment