भारतीय बाजारात आदिदासवर पुमाची सरशी

puma
भारतीय बाजारात सर्वाधिक मोठे स्पोर्ट्सवेअर म्हणून आदिदासला मागे टाकून पुमा पुढे गेले आहे. डिसेम्बर २०१८ पर्यंत १२ महिन्यात पुमाने ११५७ कोटी रुपयांची कमाई उत्पादन विक्रीतून केली आहे. त्यामुळे पुमा साठी भारत हा जगातला असा एकमेव बाजार आहे जेथे या जर्मन स्पोर्ट्स लाईफस्टाईल ब्रांडने नायके, आदिदास ला मागे टाकले आहे.

पुमाचे सीईओ यार्न गुडलन म्हणाले २०१६ मध्ये भारत आमच्या कंपनीसाठी टॉप मार्केट होताच पण २०२० पर्यंत आम्ही टॉप पाच मध्ये येऊ असा विश्वास आहे. पुमा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक गांगुली म्हणाले, २०१८ साल आम्हाला खूप चांगले ठरले आहे. जागतिक स्तरावर आमच्या ब्रांडमध्ये तेजी दिसून येते आहे. आमचा सारा भर स्टाईल वर आहे. आमच्या विकासामागे महिला कॅटेगरी आणि डायरेक्ट तो कन्झ्युमर इ कॉमर्सचा सहभाग लक्षणीय आहे.

कंपनीने भारतीय मुष्टीयोद्धा महिला खेळाडू मेरी कोम हिला ब्रांड अम्बेसिडर नेमले असून टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली बरोबर १०० कोटीचे डील केले आहे. कोहलीने पुमाच्या भागीदारीत वन ८ ब्रांड स्थापन केला आहे.

Leave a Comment