पाकच्या ताब्यातील हवाई दलाच्या वैमानिकाचे फेक फोटो, व्हिडिओ शेअर करु नका

fake
श्रीनगर : सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असून या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांच्या वतीने हे व्हिडीओ व्हायरल करुन पाकिस्तान हा भारताविरुद्ध मानसिक खेळी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट करण्यात आल्यामुळे नेटिझन्सनी ते व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करणे थांबवावे, असे आवाहन केले आहे.

दरम्यान सोशल मीडियावर पाकिस्तानी लष्कराकडून पाच व्हिडिओ चित्रित करण्यात आले असून ‘सायकॉलॉजिकल ऑपरेशन’ अर्थात मानसिक दबाव आणण्यासाठी व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्याचे सुरक्षा यंत्रणांनी सांगितले आहे.

पाकिस्तानचे सुरक्षा यंत्रणा आणि नागरिकांचे मनोधैर्य कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना बंदीवान केल्यानंतरचे व्हिडिओ भारतात अनेक नेटिझन्सनी शेअर केले असून पाकिस्तानविरोधात आग ओकली आहे.

सुरक्षा यंत्रणांसोबतच भारतीय लष्कराने देखील विंग कमांडर अभिनंदन यांचे कोणतेही व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर करु नका, असे आवाहन केले आहे. हे फोटो आणि व्हिडीओ पाकिस्तानी लष्कर आणि मीडियाकडून पसरवले जात असल्याची माहिती आहे.

दरम्यान काल मिग 21 बायसन विमानातून एका विंग कमांडरला सुरक्षितपणे स्वतःला बाहेर काढले, पण ते विमान सीमेरेषेजवळ लँड झाल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले. पाकिस्तानच्या ताब्यात फक्त एकच पायलट असून विंग कमांडरला लष्कराच्या नैतिकतेनुसार वागवले जात असल्याचा दावा पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केला आहे.

Leave a Comment