लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट विमानतळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद

airport
नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये एरियल स्ट्राइक केल्यानंतर आता पाकिस्तानच्या विमानाने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे समोर आले असून जम्मू- काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी विमानाने घुसखोरी केल्याचे वृत्त आल्यानंतरच विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला. त्यानुसार लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट विमानतळे हाय अलर्टवर असून सुरक्षेच्या कारणास्तव प्रवासी विमानांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. यामुळे अनेक विमानं विमानतळांवर अडकून पडली असल्याची माहिती मिळत आहे. तर तीन तासांसाठी श्रीनगर विमानतळ बंद करण्यात आले आहे.

दरम्यान याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरहून उड्डाण केलेले भारतीय वायुसेनेचे लढाऊ मिग-21 विमान कोसळले आहे. सराव सुरु असताना विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळत आहे. हे विमान जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील कलान गावात तांत्रिक बिघाड झाल्याने दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळत आहे. दुर्घटना झालेल्या ठिकाणी दोन मृतदेह सापडले असून हे वैमानिकांचे असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment