ओडिशामध्ये पहिल्यांदाच धावली दोन किलोमीटर लांबीची ट्रेन

orissa
इस्ट कोस्ट रेल्वे (ECoR) ने दोन किलोमीटर लांब असलेल्या मालवाहू ट्रेनला हिरवा झेंडा दाखविला असून, तीन मालगाड्या एकमेकींना जोडून ही विशालकाय ट्रेन तयार करण्यात आली असल्याचे समजते. या ट्रेनच्या अजस्त्र लांबीमुळे या ट्रेनला ‘द पायथन रेक’ असे नाव देण्यात आल्यामुळे रेल्वे रुळांवर सरपटणारऱ्या अजस्त्र अजगराप्रमाणे ही ट्रेन भासत असल्याने तिला हे नाव देण्यात आल्याचे कळते. आजवर देशामध्ये धावणाऱ्या सर्व मालगाड्यांमध्ये या ट्रेनची लांबी सर्वाधिक असल्याची शक्यता ही वर्तविण्यात येत असून, अद्याप याची पुष्टी व्हायची आहे.

या ट्रेनला एकूण १४७ बोगी असून, तीन ब्रेक आणि गार्ड व्हॅन्स होत्या. ही विशालकाय ट्रेन खेचण्यासाठी चार इंजिनेही या ट्रेनला जोडली गेली होती. या ट्रेनमधील ४५ वॅगन्सवर सामानाने भरलेले कंटेनर्स असून, ५१ कंटेनर्स रिकामे होते. तीन मालगाड्यांना जोडून बनविण्यात आलेया या ट्रेन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम बंदराच्या दिशेने प्रस्थान केले आहे. ट्रेनचा हा प्रवास हा प्रायोगिक पातळीवर करण्यात येत असून, सुरुवातीला या ट्रेनची चाचणी घेण्यासाठी १०१ किलोमीटरचे अंतर या ट्रेनने पार केले. हे अंतर यशस्वी रीतीने पार केल्यांनतर आणखी चाळीस किलोमीटर अंतरही या ट्रेनने बिनदिक्कत पार केल्याचे सांगण्यात आले.

त्यानंतर या तीन ट्रेन्स पैकी एक ट्रेन सैन्ताला स्थानकावर वेगळी करण्यात आली असून, दुसरी ट्रेन बादमल स्थानकावर वेगळी करण्यात आली. सध्या संबलपुर विभागातील खालियापली आणि डुंगरीपली स्थानकांच्या दरम्यान डबल लाईनचे निर्माण कार्य सुरु असून, त्यामुळे या ठिकाणी ट्रेन्सना जाण्यासाठी एकच लाईन उपलब्ध असते. त्यामुळे ट्रेन्स या मार्गावर अतिशय कमी वेगाने प्रवास करीत असून, बहुतेकवेळा या ट्रेन्स उशीराने धावत असतात. याच कारणास्तव तीन मालगाड्या एकमेकींना जोडून हे अंतर पार करण्याचा निर्णय रेल्वे विभागाच्या वतीने घेण्यात आल्याचे समजते.

Leave a Comment