उडणाऱ्या पक्षाला अजगराने केले सावज

catch
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तुम्हाला एका विशालकाय अजगराने उडत्या पक्षाला आपल्या विळख्यात घेतले असल्याचे दिसत आहे. कॅथी गाल नावाच्या एका महिलेने आपल्या फेसबुकवर अकाऊंट हा व्हिडीओ शेअर केला आहे.

(व्हिडीओ सौजन्य – FunJohn)
कॅथीच्या घराजवळ एक ऍन्टिना लावलेला आहे. त्यालाच हा अजगर लोंबकळलेला असून त्याने आपल्या जबड्यात एका पक्षाला पकडले आहे. याबाबत कॅथी सांगते की ती 20 फेब्रुवारी रोजी नेहमी प्रमाणे आपल्या गच्चीत कॅमेरा उभा असताना तिला हे दृश्य दिसले ते तिने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

पहिल्यांदा हे दृश्य पाहताना कॅथीच्या तोंडच पाणीच पळाले. पण तिने स्वत:ला सावरत हिंमत करून या घटनेचा एक व्हिडिओ शूट केला. कॅथीने हाच व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ‘किंग्सक्लिफ हॅपनिंग्स’ नावाच्या एका फेसबुक ग्रुपमध्ये शेअर केल्यानंतर फारच थोड्या वेळात हा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिलाय आणि शेअरही केला आहे.

Leave a Comment