इंडोनेशियामध्ये पुन्हा आढळली ‘मेगाचिले प्लुटो’ नामक माशी

Flying
जगामध्ये आकाराने सर्वात मोठी असलेलली ‘मेगाचिले प्लुटो’ पृथ्वीतलावरून अस्तंगत झाली असल्याचे समजले जात असतानाच चाळीस वर्षांच्या काळानंतर इंडोनेशियाच्या काही दुर्गम प्रांतांमध्ये ही माशी पुन्हा आढळली आहे. या माशीचा आकार मानवी हाताच्या अंगठ्याइतका मोठा असल्याने ही माशी सहज पाहिली जाऊ शकते. मात्र एकोणिसाव्या शतकामध्ये ब्रिटीश निसर्गतज्ञ आल्फ्रेड वॉलेस यांनी सर्वप्रथम शोधून काढलेली ही माशी १९८१ सालापासून दृष्टीस पडली नसल्याचे समजते.
Flying1
ब्रिटीश निसर्गतज्ञ आल्फ्रेड रसेल वॉलेस यांनी माशीच्या या प्रजातीचा शोध लावला असून या माशीच्या प्रजातीला ‘फ्लाईंग बुलडॉग’ या नावानेही संबोधले जाते. तब्बल चाळीस वर्षांच्या कालावधीनंतर ही माशी पुन्हा आढळली असून, इंडोनेशिया येथील नॉर्थ मोलुकास द्वीपावर ही माशी आढळली आहे. ही माशी मुंग्याच्या वारुळात घर करीत असून, हिचे पंख रंगेबिरंगी असतात. तसेच ही माशी उडत असताना हिच्या पंखांच्या हालचालीचा विशिष्ट आवाज येत असतो.
Flying2
ही माशी ज्या ठिकाणी आढळली आहे, तेथील स्थानिक लोकांना हिच्याबद्दल माहिती देऊन हिचे संवर्धन करण्यास प्रवृत्त करण्याचे प्रयत्न ग्लोबल वाईल्डलाईफ कॉन्झर्व्हेशनच्या वतीने करण्यात येत आहेत. या पूर्वी या माशीचे अस्तित्व शोधून काढण्यासाठी आयोजित केलेल्या अनेक मोहिमा असफल ठरल्या होत्या. ही माशी दिसायला मोठी असली तरी अतिशय दुर्गम प्रांतांमध्ये आढळणारी आहे. त्यामुळे आता ही माशी पुन्हा एकदा आढळली असल्याने हिचे संवर्धन केले जावे आणि ही प्रजाती अस्तंगत होऊ नये यासाठी सर्व प्रयत्न केले जात असल्याचे समजते.

Leave a Comment