बेल्जियममधील फॅशन शोतील सर्वच पोशाख चॉकलेटचे

dress
बेल्जियम मधील ब्रसेल्स येथे सध्या चॉकलेट फेस्टिव्हल सुरु असून, या अंतर्गत आयोजित फॅशन शोमध्ये देखील चॉकलेटने बनविले गेलेले पोशाख प्रदर्शित करण्यात आले होते. अनेक सुंदर महिला मॉडेल्सनी परिधान केलेले हे पोशाख सर्वांच्याच चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरले. या फॅशन शोमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या तेरा निरनिराळ्या पोषाखांच्या पैकी काही पोशाख संपूर्णपणे चॉकलेटने बनले असून, काही पोशाखांचे थोडेच भाग चॉकलेटने बनविण्यात आले होते.
dress1
या तेरा पोषाखांच्या पैकी सर्वात खास समजला गेलेला पोशाख सुप्रसिद्ध डिझायनर जियोवानी बायसिओलो व सुप्रसिद्ध चॉकलेट मेकर जेआन क्रिस्तोफ हुबर्ट यांच्या जोडीने बनविला असून, या पोशाखाचे वजन आठ किलोंचे आहे. या ड्रेसचे स्ट्रक्चर बनविण्यास्ठी स्टील आणि पॉलिस्टायरीनचा वापर केला गेला असून, या स्ट्रक्चरवर चॉकलेटच्या लेअर्स लपेटून हा पोशाख बनविण्यात आला होता. स्टीलच्या स्ट्रक्चरवरील सर्व लेअर्स पूर्णपणे चॉकलेट आणि कोको पावडचा वापर करून बनविण्यात आले होते.
dress2
त्याचबरोबर चॉकलेटने बनविलेले एक ‘हेड ड्रेस’ देखील या फॅशन शो साठी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. तसेच या फॅशन शो द्वारे अनेक डिझायनर्सनी चॉकोलेट बद्दलच्या आपल्या निरनिराळ्या कल्पना आपल्या पोषाखांच्या माध्यमातून प्रदर्शित केल्या असून, हे पोशाख तयार करण्यासाठी अनेक कोको प्लांटेशन्स मधून कोको बीन्स मागविल्या गेल्या असल्याचे समजते.

Leave a Comment