जगभरामध्ये बिनपगारी काम करणाऱ्या महिलांच्या कामाचा मोबदला कोट्यवधींच्या घरात

woman
जगभरातील अगणित महिला त्या वर्षभर करीत असलेल्या कामाचा कोणत्याही स्वरूपामध्ये मोबदला न घेता काम करीत असतात. पण त्या महिला करीत असलेल्या कामाचा मोबदला देण्याची वेळ आली, तर ही रक्कम सुमारे ७१० लाख कोटी रुपयांच्या घरात जाणारी ठरेल. जर ही रक्कम डॉलर्समध्ये मोजायची झाली, तर तीन ट्रिलियन डॉलर्स इतकी ही रक्कम आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी ‘अॅपल’ आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी खर्च करीत असलेल्या रकमेच्या त्रेचाळीस पटीने ही रक्कम अधिक असल्याचे म्हटले जाते. ‘ऑक्सफेम’ द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये हे तथ्ये मांडण्यात आले आहे.
woman1
जगभरातील गृहिणी किंवा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कामे करणाऱ्या महिलांना त्यांच्या कामाचा आर्थिक मोबदला दिला जात नाही. भारतामध्येही गृहिणी आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे. ‘ऑक्सफेम’ ने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार जगभरातील गृहिणी त्यांच्या दररोजच्या कामासाठी दिवसाची सरासरी ३१२ मिनिटे खर्च करीत असतात. खेडेगावांमध्ये राहणाऱ्या गृहिणींचा दैनंदिन कामांसाठी लागणारा वेळ हा आणखी जास्त असतो. या कामाचा आर्थिक मोबदला या महिलांना दिला जात नाही.
woman2
रिपोर्टनुसार केवळ भारतातच नाही, तर जगभरामध्ये सर्वत्र आर्थिक असमानता वाढत असून, त्यामुळे स्त्रीवर्ग सर्वात जास्त प्रभावित होत आहे. संपूर्ण जगभरातील कोट्याधीशांच्या यादीमध्ये ही महिलांचा समावेश कमीच आहे. समस्त जगामध्ये सर्वात धनाढ्य असलेल्या ११९ अरबपतींच्या यादीमध्ये केवळ नऊ महिला समाविष्ट आहेत.

Leave a Comment