आकाशाच्या कॅनव्हासवर पायलटची चित्रकला, लिहिले ‘आय अॅम बोअर्ड’

pilot
खरे तर वैमानिकांचे विमान उडविण्याचे काम हे अतिशय कौशल्याचे समजले जाते. तसेच प्रत्येक वैमानिकाला आपले काम मनापासून प्रिय असल्याचेही आपल्याला वाटत असते. मात्र ऑस्ट्रेलिया देशातील अॅडलेड येथील एका वैमानिकाने हा समज खोटा ठरविला आहे. या वैमानिकाने विमान उडवीत असताना, आपल्या विमानाच्या ‘कंडेन्सेशन ट्रेल्स’, म्हणजेच विमानातून बाहेर पडणाऱ्या पांढऱ्या धुराच्या सहाय्याने चक्क ‘मी कंटाळलो आहे’ अश्या अर्थाची ‘आय अॅम बोअर्ड’ अशी अक्षरे आकाशामध्ये काढली. या वैमानिकाने आकाशाच्या कॅनव्हासवर केलेल्या या चित्रकलेचा व्हिडियो इंटरनेटवर खूपच लोकप्रिय होत आहे.
pilot1
एक वृत्तवाहिनीने प्रसारित केलेल्या वृत्तानुसार हा वैमानिक उडवीत असलेले विमान डायमंड स्टार प्लेन असून, सुमारे तीन तासांच्या टेस्ट फ्लाईट साठी वैमानिक हे विमान घेऊन गेला असता, त्याने आपला संदेश आकाशामध्ये रेखाटला असल्याचे समजते. त्याने आकाशामध्ये रेखाटलेला हा संदेश जमिनीवरून दिसणे जरी अश्यक्य असले, तरी जे तज्ञ या विमानाचे ‘लाईव्ह ट्रॅकिंग करीत होते, त्यांना हा संदेश व्यवस्थित वाचता आला.
pilot2
फ्लाईट-अवेअर नामक एका वेबसाईटने या वैमानिकाच्या चित्रकलेची छायाचित्रे टिपली असून, ही छायाचित्रेही झपाट्याने व्हायरल होत आहेत. यावर नेटकऱ्यांच्या निरनिराळ्या प्रतिक्रियाही पहावयास मिळत आहेत. वैमानिकांनी आपल्या विमानाच्या कंडेन्सेशन ट्रेल्सच्या मदतीने आकाशामध्ये काही ना काही आकृती चितारण्याचा हा पहिलाच प्रसंग नसल्याचे सांगून २०१७ साली एका अमेरिकन वैमानिकाने तो उडवीत असलेल्या लढाऊ विमानाच्या ट्रेल्सने एक प्रचंड मोठे ‘फॅलिक सिम्बॉल’ आकाशामध्ये बनविले होते.

Leave a Comment