हॉलीवूड सुपरस्टार ह्यु जॅकमनच्या नावे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये विक्रम

hugh-jackman
सुप्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता ह्यु जॅकमन यांच्या नावे सर्वाधिक काळाकरिता एका सुपरहिरोची भूमिका साकारल्याचा नवा विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदविण्यात आला आहे. ह्यु जॅकमन यांनी ही भूमिका गेली सोळा वर्षे आणि दोनशे अठ्ठावीस दिवस इतक्या काळामध्ये सातत्याने साकारली आहे. एस एस शोबिझने यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध केले असून, ‘द वूल्वरीन’ या सुपरहिरोची भूमिका साकारलेल्या ह्यु जॅकमन यांना ‘धिस मॉर्निंग’ नामक ब्रिटीश शोमध्ये ‘लाइव्ह अॅक्शन मार्व्हल सुपरहिरो’ म्हणून सर्वाधिक काळाकरिता ही भूमिका साकारल्यानिमित्त हा सन्मान देण्यात आला. ह्यु सोबत हा सम्मान त्यांचे ‘एक्स मेन’मधील सह कलाकार पॅट्रिक स्ट्यूअर्ट यांनाही देण्यात आला आहे.

हा सम्मान प्राप्त झालेल्या ह्यु जॅकमन यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले असून इतका मोठा सम्मान प्राप्त झाल्याबद्दल आपल्याला स्वत:चा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ह्यु जॅकमन यांनी साकारलेला ‘वूल्वरीन’ अतिशय लोकप्रिय ठरलाच, पण त्याचबरोबर संगीताची उत्तम जाण आणि अतिशय सुरेल गळा लाभलेल्या ह्यु यांनी ब्रॉडवे मधील अनेक नाटकांमध्ये केलेल्या भूमिकाही अतिशय लोकप्रिय ठरल्या आहेत.

Leave a Comment