प्रिन्स फिलीप यांच्या अपघातग्रस्त कारच्या अवशेषांची ऑनलाईन विक्री.

prince
इंग्लंडची राणी एलिझाबेथचे पती प्रिन्स विलियम यांच्या गाडीला काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यावेळी दुसऱ्या एका गाडीला धडकल्यामुळे प्रिन्स फिलीप स्वतः चालवीत असलेली त्यांची गाडी उलटली होती. सुदैवाने प्रिन्स फिलीप यांना या अपघातामध्ये फारशी इजा झाली नसली, तरी या अपघाताचा मानसिक धक्का त्यांना नक्कीच बसला होता. प्रिन्स फिलीप चालवीत असलेया लँडरोव्हर ‘फ्री लँडर’ या गाडीचे मात्र अपघातामध्ये मोठे नुकसान झाले होते.
prince1
याच अपघातग्रस्त गाडीचे अवशेष सध्या ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून, या अवशेषांची किंमत ६५ हजार पौंड ठेवण्यात आली आहे. भारतीय चलनामध्ये ही किंमत सुमारे साठ लाख रुपयांच्या आसपास आहे. या गाडीच्या अवशेषांची विक्री करण्यसाठी आयोजित करण्यात आलेल्या लिलावामध्ये या अवशेषांसाठी १३९ ऑफर्स आल्याचे समजते.
prince2
अपघातग्रस्त गाडीच्या अवशेषांच्या विक्रीतून आलेली रक्कम लंडन मधील कॅन्सर रिसर्च सेंटरला देण्यात येणार असल्याने या पैशांचा योग्य कामाकरिता उपयोग केला जाणार आहे. या अवशेषांमध्ये प्रिन्स फिलीप यांचा डीएनए असण्याची शक्यता असून, त्यापासून एखादा नवीन मोड्यूल तयार केला जाण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. प्रिन्स फिलीप यांचे वय सध्या ९७ वर्षांचे असून, अपघाताच्या वेळी त्यांनी सीट बेल्ट न लावल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment