सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच शिक्षकांना देखील सातवा वेतन आयोग लागू

pay-commission
मुंबई – सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होत असतानाच शिक्षकांना मात्र वेतन आयोग लागू करण्यात आला नसल्याचा आक्षेप संघटनांनी घेतल्यानंतर आता राज्य सरकारने अनुदानित अशासकीय शाळांतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग अखेर लागू केला असून सरकारने याबाबतचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला.

आता सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच शिक्षकांनाही वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. सुधारित वेतन आयोग राज्यातील अनुदानित खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये आणि सैनिकी शाळांतील पूर्णवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनतर शिक्षकांना याचा लाभ मिळाला होता तसेच पाचव्या वेतन आयोगाचा लाभ शिक्षकांना सुमारे चार महिन्यांनतर देण्यात आला होता. सातवा वेतन आयोग काही दिवसांतच देण्यात आला आहे.

Leave a Comment