‘तेजस’मधून पी. व्ही. सिंधूची गगन भरारी

PV-sindhu
बंगळुरु – बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या ‘एरो इंडिया, एअर शो’ मध्ये भारताची आघाडीची बँडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने सहभाग घेतला. भारतीय हवाईदलाच्या खात्यात नुकत्याच दाखल झालेल्या ‘तेजस’ विमानातून सिंधूने यावेळी उड्डाणही केले. सिंधूची तेजस विमानातून उड्डाण करण्यासाठी हवाई दलात महिला सैनिकांनी केलेल्या उत्तम कामगिरीचा गौरव करण्यासाठी निवड करण्यात आली.

नुकतच सर्व सोपस्कार पार पाडून हवाई दलाच्या ताफ्यात हिंदुस्थान एरोनॉटीकल लिमीटेड कंपनीद्वारे बनवण्यात आलेले तेजस विमान सहभागी झाले आहे. हवाई दलाच्या ताकदीत या विमानामुळे अजुन भर पडणार असल्याचे मत अनेक संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. भारताचे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनीही काही दिवसांपूर्वी तेजस विमानातून उड्डाण केले होते.

Leave a Comment