एकत्र झळकणार दीपिकाचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ ?

combo
रणवीर सिंह आणि रणबीर कपूर ही नावे सिनेसृष्टीसाठी काही नवीन नाहीत आणि ही नावे एका अभिनेत्रीमुळे तर जास्तच चर्चेत होती. ती अभिनेत्री म्हणजे बॉलीवूडची मस्तानी दीपिका पादूकोण. दीपिकाचे आधी रणबीर अशी अफेअर होते. त्यानंतर तिने नुकतीच रणवीरशी लगीनगाठ बांधली. तर रणबीर सध्या आलिया भट्टला डेट करत आहे. तरी देखील सिनेरसिकांना वाटते की दीपिकाच्या भूतकाळ आणि वर्तमानकाळाने एकत्र काम करावे. पण आता त्यांची ही इच्छा काही अंशी पूर्ण होणार आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण रणवीर आणि रणबीर लवकरच एकत्र स्क्रिन शेअर करणार असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान रणवीर आणि रणबीर हे कोणत्याही चित्रपटात नाहीतर एका जाहिरातीत झळकणार असून एका कोल्ड ड्रिंक ब्रॅण्डने या दोघांशी संपर्कही साधला आहे. पण या दोघांकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. आधीपासूनच रणवीर या ब्रॅण्डचा सदिच्छादूत आहे. पण रणबीरला ही कंपनी रणवीरसोबत गेस्ट रोलमध्ये आणू इच्छिते. त्याचबरोबर यासाठी कंपनीने रणबीरला मोठी रक्कमही ऑफर केल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment