सीबीआयची चंदा कोचर यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस

chanda-kochhar
मुंबई – सीबीआयने चंदा कोचर यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली असून देश सोडून जाण्यास चंदा कोचर यांना मनाई करण्यात आली आहे. सर्व विमातळांवरील इमिग्रेशन विभागाला चंदा कोचर यांनी देश सोडून जाण्याचा प्रयत्न केल्यास तशी माहिती आम्हाला दिली जावी असे सीबीआयने सांगितलं आहे.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) चंदा कोचर, वेणूगोपाल धूत यांच्यासह इतर पाचजणांविरोधात पदांचा गैरवापर करत मर्जीतल्या लोकांचा आर्थिक फायदा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर याप्रकरणात चंदा कोचर यांच्या सोबत त्यांचे पती, त्यांच्या सहकारी व्हिडीओकॉन कंपनीचे दोन युनीट आणि कोचर यांच्या न्यूपॉवर रेनेवेबल्स तसेच सुप्रीम ऊनर्जी या कंपन्यांचाही समावेश आहे.

Leave a Comment